You are currently viewing या खजिन्याचा शोध का घेतला गेला??

या खजिन्याचा शोध का घेतला गेला??

लहान मुलांच्या भावविश्वात असंख्य कल्पना, अगणित प्रश्न रुंजी घालत असतात. प्रत्येक घटनेचा तन्मयतेने अनुभव घेण्याची नैसर्गिक उर्मी त्यांच्या ठायी असते. असे हे लोभस बालपण वेगवेगळ्या अनुभवांनी, विविध संकल्पनानी समृद्ध करण्यासाठी पुस्तकांसारखा दूसरा जोडीदार नाही.

आपल्यापैकी सगळ्यांना वाटत असत की आपल्या मुलांनी छान छान पुस्तके वाचावीत, गोष्टी वाचाव्यात. मात्र आजकाल मोबाइल, टॅब अशा स्क्रीन मुळे मुले पुस्तकांपासून लांब गेली आहेत. याशिवाय लहान मुलांना वाचता येतील अशी विविध प्रकारची पुस्तके खूप कमी प्रमाणात मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. विशेषतः गावांमध्ये आणि निमशहरी भागात लहान मुलांची पुस्तके जास्त प्रमाणात मिळत नाहीत. मिळाली तरीही त्यात चित्रे रंगवण्याची पुस्तके जास्त असतात असा माझा अनुभव होता.

म्हणून मग त्यांना आवडतील अशी पुस्तके शोधताना वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या विषयांची, लहान-मोठी, रंगीत, जाड पुठ्ठयांची तर काही नेहमीच्या पुस्तकांसारखी, काही मोठी तर काही एकदम लहानशी हातात मावतील अशी, वेगवेगळ्या आकारातील, वेगवेगळ्या भाषेतील असंख्य पुस्तक सामोरी येत गेली. म्हणून मग अशा या अत्यंत संपन्न साहित्याला एकत्रितपणे पाहिल्यावर एकच नाव सुचलं ते म्हणजे खजिना!! लहानग्यांच्या शब्दांनी आणि चित्रांनी सजलेल्या भावविश्वाला पुरून उरेल असा खजिना!!  

उत्साहाने भरून वाहणारी, प्रश्नांची उत्तरे शोधण्याची धडपड करणारी, प्रत्येक संवेदना टिपणारी साधारण 5 ते 15 ही आयुष्यातली ही अत्यंत महत्वाची वर्ष.  ही आयुष्यातली वर्ष अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वैविध्यपूर्ण पुस्तके आपल्यासमोर आणताना मनस्वी आनंद होत आहे.     

आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या निरागसवृत्तीने पाहणारं, आपल्या नितळ अशा हृदयाने त्यातील भावभवना उत्कटतेने व्यक्त करणारं  आणि त्याला आपल्या नैसर्गिक बुद्धिमतेची जोड देऊन त्यातून सृजणाची निर्मिती करणारं हे बालपण मोबाइल आणि एक क्लिक वर मिळणाऱ्या माहितीच्या रेट्यात गुदमरून जाऊ नये म्हणून आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लेकरांना पुस्तकांचा हा अमूल्य ठेवा देऊया!! पुस्तकांचा गंध, त्यांचा स्पर्श, पुस्तकांची ओढ या सगळ्यातला आनंद त्यांना अनुभवायला देऊया!!

This Post Has 2 Comments

  1. Supriya Sawant

    माझ्या मुलींसाठी मी कायम चांगल्या पुस्तकांच्या शोधात होते.. माझ्या लहानपणी वाचलेली बरीच पुस्तक मला तिनेसुद्धा आवर्जून वाचावी असं वाटायचं…पण हल्ली चांगली मराठी पुस्तक शोधायला खूप दुकान फिरावी लागतात किंवा वेगवेगळ्या site वर जाऊन ती online शोधावी लागतात.. पण खजिना. कॉम हि site या सर्वावर उत्तम उपाय मला सापडला..एकाच site वर वेगवेगळ्या वयोगटानुसार option आहेत.. खूप सुंदर मजेशीर पुस्तकांच विश्व् एका क्लिक वर उपलब्ध आहे…Thank u khajina team..

Leave a Reply