समशेर_आणी_भुतबंगला
भारत_सासणे
साहित्य_अकादमी
पुस्तकांचा_खजिना
बालसाहित्य
आठ दहा दिवसांपूर्वीच भाचे कंपनी सुट्टीला आलेली होती. सध्या घरात पुस्तकेच पुस्तके असल्याने येता जाता त्यातून पुस्तके बघून ती चाळत होती, चार दोन पाने वाचत होती. पण मग या सगळ्या खजिन्यातून त्यांना #भारत_सासणे यांचं “समशेर आणि भूतबंगला” सगळ्यात जास्त आवडलं आणि सगळ्यांनी अगदी एकत्र बसून ते वाचून संपवलं. सस्पेन्स स्टोरी असल्याने त्यांना अजिबात ब्रेक नको होता. तिघेही इंग्रजी माध्यमात असूनही छान पद्धतीने मराठी पुस्तक वाचत होते. पुस्तकाचे मुखपृष्ठ एकदम लक्ष वेधक आहे, आतील पानेही रंगीत तसेच गोष्टी मोठ्या अक्षरात आहेत. आणि पुस्तक 72 पानांच असलं तरीही लहानस दिसत असल्याने मुलं पटकन उचलतात. याच मालिकेतील #समशेर_आणि_लांब_मिशीवाल्या_माणसाचं_रहस्य हे पुस्तक देखील मुलांनी लागोलाग संपवलं. #समशेर_आणि_परग्रहावरचा_माणूस हे पुस्तक शिल्लक नसल्याने मुलांना वाचायला मिळाले नाही. तिन्ही पुस्तके मुलांना अगदी आवडतील अशी आहेत.तर अशा या समशेर कुलुपघरे च्या #समशेर_आणि_भूतबंगला या पुस्तकाला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे हे आताच समजले. फार आनंद झाला. मुलांमुळे पुस्तक घरभर फिरत होत त्यामुळे बाकी पुस्तकांपेक्षा हे जरा जास्त नजरेत भरलं होत! लेखक भारत सासणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुलांना साहित्य अकादमी लक्षात यायची नाही मात्र त्यांना आवडलेल्या पुस्तकाला मोठ्ठ बक्षीस मिळालं आहे हे आता त्यांना लवकरात लवकर सांगते.
www.khajina.co.in
#khajinachildrenbookstore